क्रीडा

पृथ्वी शॉला विंडीज विरूद्ध वनडेत संधी मिळणार

प्रतिनिधी
Oct 17 / 2018

आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पदार्पणातच शतकी खेळी करणाऱ्या फलंदाज पृथ्वी शॉला वेस्ट इंडिजविरूद्ध होणाऱ्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये संधी देण्यात आलेली नाही. पण उर्वरित तीन सामन्यांमध्ये त्याला संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते आहे. भारत विं वेस्ट इंडिज कसोटी सामन्यातून पृथ्वी शॉने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावले होते. तसंच भारत वि. वेस्ट इंडिज कसोटी मालिकेचा मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार पृथ्वी शॉला देण्यात आला होता. इतकी उत्कृष्ट खेळी केल्यानंतरही त्याला वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये जागा देण्यात आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला वगळण्यात आलेलं नसून पुढच्या तीन सामन्यांमध्ये संधी दिली जाणार आहे. २०१९चा वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून भारताने खेळाडूंचे रोटेशन करण्याची नीती अवलंबली आहे. येत्या एक वर्षात चांगल्या खेळाडूंचे रोटेशन होत राहणार आहे. त्याअंतर्गतच पृथ्वीला दोन सामन्यातून बाहेर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.