जगावेगळे

ब्लड मून मुळे येत्या २७ जुलै रोजी घडू शकतात या घटना?

प्रतिनिधी
Jul 04 / 2018

न्यूज डेस्क - येत्या २७ जुलै रोजी शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण दिसणार आहे. यादरम्यान जगभरातील अनेक देशांमध्ये लाल रंगाचा चंद्र दिसणार आहे. याला ब्लड मून असे संबोधले जाते. या ग्रहणाचा काळ १ तास ४३ मिनिटांचा राहील, या ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर मात्र जगभरात अफवांना जणू पेव फुटू लागले आहे.परदेशात काही जण याला बायबलशी जोडून जगाच्या अंताची सुरुवात असल्याचे सांगत आहे. ख्रिश्चन कनस्पायरसी थेरिस्त च्या मते, हा ब्लड मून इस्रायलपासून मिडिल ईस्टपर्यंत दिसेल. याचा सर्वात जास्त परिणामही तिथेच पाहायला मिळणार आहे. या थेअरीवर विश्वास ठेवणाऱ्या अमेरिकी पाद्री पॉल बॅगली म्हणाले की, जगाचा शेवट आता आणखीनच जवळ आला असून मला वाटत नाही की, या शतकानंतर दुसरे एखादे शतक येईल.या ग्रहणामुळे जगभरात भूकंप, वादळ, ज्वालामुखी विस्फोट यासारख्या नैसर्गिक आपत्तीही येतील. असा दावाही बॅगली यांनी केला आहे. ग्रहण काळादरम्यान चंद्रावर पृथ्वीची छाया पडेल. यादरम्यान सूर्याचा प्रकाश यामुळे प्रभावित होईल, ज्यामुळे चंद्र लाल ते नारंगी रंगाचा दिसायला लागेल. ग्रहण हटताना हळू-हळू हा रंग पूर्ववत होईल.