कोल्हापूर

व्हॅनचा टायर फुटून झालेल्या अपघातात नऊ प्रवासी जखमी!

प्रतिनिधी
Apr 16 / 2018

कोल्हापूर : व्हॅनचा टायर फुटून व्हॅन रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात पुण्याला जाणारे हुबळीचे नऊ प्रवाशी जखमी झाले. सदरचा अपघात. पुणे -बेंगळुरु महामार्गावर टोप येथे झाला. यात तीन लहान मुलांचा समावेश आहे. १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे . घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे. श्रीशैल चिदानंद बडगेर (वय ४५), शांता यराप्पा बडगेर (वय ६०), संजू चितानंद बडगेर (वय १८), द्राक्षायणी बडगेर (वय ४५), महेश्वरी शेखर बडगेर (२८), शशिकला चिदानंद बडगेर (वय ३५), राणी शिवानंद बडगेर (वय १०), विनायक श्रीशैल बडगेर (वय १२), सुश्मिता बडगेर (वय ०६ रा. सर्व एम.के. हुबळी, जि. बेळगांव, कर्नाटक) अशी जखमींची नांवे आहेत. चेहरा, डोकं, हात व पायास जखमा झाल्या आहेत. या अपघातात व्हॅनचेही मोठे नुकसान झाले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी हुबळी येथील बडगेर कुटुंबातील नऊजण मारूती ओमनी व्हॅनमधून पुण्याला निघाले होते. एका नातेवाईकाच्या घरी धार्मिक कार्यक्रम असल्याने सोमवारी सकाळी ९ वाजता घरातून बाहेर पडले. दुपारी १ वाजता त्यांची व्हॅन टोप येथील पूनम हॉटेलजवळ आल्यानंतर गरम रस्त्यावर टायर फुटल्याने गाडी रस्ता दुभाजकावर आदळली. यावेळी गाडीतील लोक एकमेकांच्या अंगावर कोसळले, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्या, तोेंडाला व डोक्यास मार लागला आहे.

व्हॅनचा टायर फुटून झालेल्या अपघातात नऊ प्रवासी जखमी!
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *