कोल्हापूर

कायद्याची पायमल्ली होत असेल तर महापालिका बरखास्त करावी : दिलीप देसाई

प्रतिनिधी
Apr 16 / 2018

कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील अनाधिकृत बांधकामे पाडणे अनिवार्य आहे. एमआरपीटी कायदा 52 प्रमाणे फक्त दंड भरून बांधकामे नियमित करून घेता येत नाहीत. कायद्याची पायमल्ली होत असेल तर हा कायदाच रद्द करावा, किंवा शासनाने महापालिका बरखास्त करून राज्य शासनाने महापालिका चालवावी, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे शासनाने एक वटहूकुम जारी केला आहे. 2015 पर्यंत बांधकामे नियमित करावीत, परंतु त्यामध्ये प्रामुख्याने व्यावसायिक दृष्टीकोनातून बांधलेली बांधकामांचा त्यामध्ये समावेश होत नाही. किंबहुना रहिवासी, शेतजमिनी यांच्यावर बांधलेली बांधकामे तीही रहिवाश्याकरिता असतील तर त्याला हा वटहुकूम जारी होतो. परंतु गांधीनगरच्या मुठभर धनदांडग्या लोकांसाठी काम करणाऱ्या नेत्यांना शहरामध्ये अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईमुळे अनेक गरीब लोकांचे संसार उद्वस्त झाले आहेत. त्याकडे कधी लक्ष दिले नाहीत. शहरामध्ये अनेक प्रश्न असताना नेत्यांना गांधीनगरच्या लोकांसाठी का काम करावे वाटते, हेच समतज नाही. यामध्ये प्रामुख्याने अप्पर जिल्हाधिकारी डी.डी. वळवी यांच्या कार्यकाळामध्ये बोगस, बेकायदेशीर सनदांची चौकशी व्हावी, कारण वळवी यांनी आपल्या कार्यकाळामध्ये अनेकांना बोगस सनद दिली आहे. त्यामुळे अनेक घोटाळे निर्माण झाले आहेत. त्याचीही चौकशी करण्याची मागणी यावेळी देसाई यांनी केली. यावेळी उपाध्यक्ष सुनिल कोरडे, सचिव बुरहान नाईकवडी उपस्थित होते

कायद्याची पायमल्ली होत असेल तर महापालिका बरखास्त करावी : दिलीप देसाई
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *