कोंकण

आ.हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते विविध विकास कामांची भूमिपुजने!

प्रतिनिधी
Apr 16 / 2018

राजापूर प्रतिनिधी:- राजापूर तालुक्यातील विविध विकास कामांची भूमिपुजने येथील विधान परिषद सदस्या आ.सौ.हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडली. राजापूर शहरातील दिवटेवाडी येथील शिंदे घर ते रानतळेकडे जाणारा रस्ता तसेच ओगलेवाडी परिसरातील धुळप घर ते तांबळ या दोन रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी विधान परिषद सदस्या सौ.हुस्नबानू खलिफे यांच्या प्रयत्नांमुळे निधी मंजूर झाला. या दोन्ही कामांची भूमिपुजने सोमवारी पार पडली. यावेळी राजापूर नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष जमिर खलिफे, माजी नगराध्यक्षा सौ.वैशाली मांजरेकर, नगरसेविका सौ.मुमताज काझी, सौ.स्नेहा कुवेसकर, नगरसेवक हनिफ युसूफ काझी, गोविंद चव्हाण, विनय गुरव, श्री.खडपे, श्री.आमकर, माजी नगरसेवक चंद्रकांत सोगम, संजय ओगले आदींसह नागरीक उपस्थित होते.

आ.हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते विविध विकास कामांची भूमिपुजने!
Categories : कोंकण Tags : कोंकण
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *