थोडक्यात महत्वाचे

तब्बल 103 वर्षांनी मिळाला कुटुंबप्रमुखाचा मृत्यूचा दाखला:आयुक्त तुकाराम मुंढेंच्या प्रयत्नांना यश!

प्रतिनिधी
May 16 / 2018

नाशिक : नाशिकचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्तक्षेपानंतर तब्बल 103 वर्षांपूर्वीचं प्रकरण निकाली निघालं आहे. जुने नाशिकमध्ये राहणाऱ्या निजामुद्दीन नजरअली पिरजादा यांचा 5 फेब्रुवारी 1915 मध्ये मृत्यू झाला. त्याकाळी ब्रिटीश राजवट होती. पिरजादे यांचा दाखला मोडी लिपीत लिहिण्यात आला होता. त्यानंतर देश स्वतंत्र झाला, नाशिक नगरपालिकेची महापालिका झाली. मात्र मृत्यूचा दाखला मिळत नव्हता. ब्रिटीशकालीन दाखले मोडी लिपीत असल्याने, कधी मोडी लिपी वाचक नाही तर कधी अधिकारी नाही अशी वेगवेगळी कारण सांगून अर्जदाराला माघारी पाठवलं जात होतं.अखेर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर, 103 वर्षांनी निजामुद्दीन पिरजादा यांच्या मृत्यूचा दाखला मिळाला.

तब्बल 103 वर्षांनी मिळाला कुटुंबप्रमुखाचा मृत्यूचा दाखला:आयुक्त तुकाराम मुंढेंच्या प्रयत्नांना यश!
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *