कोल्हापूर

शिक्षण संस्थातील शिक्षक भरती केंद्रीय पध्दतीने करणार - शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे

प्रतिनिधी
Jun 09 / 2018

कोल्हापूर : शिक्षक भरतीतील होणाऱ्या भ्रष्ट्राचाराला आळा घालण्यासाठी सर्व शाळांतील शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने केली जाणार आहे. यामुळे शिक्षक भरतीसाठी कोणालाही एक रुपया द्यावा लागणार नाही अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. विवेकानंद महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या शुभारंभा प्रसंगी बोलत होते. शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे जन्मशताब्दी महोत्सवाचा शुभारंभ विवेकानंद महाविद्यालयात पद्मश्री डॉ.डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, तर अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते बापूजींच्या टपाल तिकिटाचे आणि शताब्दी लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रयत शिक्षण संस्था आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थासारख्या संस्था निर्माण झाल्यामुळे बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाच्या संधी मिळाली. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणात प्रगती झाली. गेल्या चार वर्षांपासून शिक्षण पद्धतीत थोडा बदल करत आहे याला थोडा विरोधही होतोय. शिक्षणाच्या गुणवत्तेकडे लक्ष न देता यापूर्वी अनेक शाळांना परवानगी दिली. त्यामुळे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडले नसल्याचे स्पष्ट यावर्षीपासून दहावीला तोंडी परीक्षेचे 20 मार्क मिळणार नाहीत त्यामुळे आगामी निकाल 70 ते 80 टक्क्यांवर येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले दहावीच्या फेर परिक्षेमुळे 5 टक्के मुले पास होतात त्यांचे नुकसान होत नाही. म्हणून फेर परीक्षेला सुरवात केली. पहिल्या वर्षी 35 हजार मुले पास झाली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. जीएसटी लागू झाल्यावरसुद्धा आपला अभ्यासक्रम बदलला नाही. संस्थांना अभ्यासक्रमात स्वायत्तता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिक्षक भारतातील भ्रष्ट्राचाराला आला घालण्यासाठी यापुढे सर्व शिक्षक भरती महाराष्ट्र केंद्रीय पद्धतीने करण्यात येणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाचा जो आदर्श दिला. त्या आदर्शानुसार राज्यातील शिक्षण सुरू आहे. शाहूंच्या विचारांसाठी त्यांच्या मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या आदेशाच्या शताब्दीनिमित्य वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतील अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी दिली. यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम करण्याची गरज असून यामुळे अधिक सक्षम पिढी घडेल. कर्मवीर भाऊराव पाटील आणि बापूजी साळुंखे यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञान गंगा पोचवली. बापूजींच्या शताब्दीनिमित्य संस्थेच्या 395 शाळांमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देणार अशी ग्वाही ग्वाहीही पालकमंत्री पाटील यांनी दिली. यावेळी महापौर शोभा बोन्द्रे यांनी या जन्मशताब्दी महोत्सवाच्या शुभारंभाला शुभेच्छा दिल्या. यावेळी कुलगुरू डॉ देवानंद शिंदे, आय डी पाटील, प्राचार्या शुभांगी गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अभयकुमार साळुंखे यांनी बापूजी साळुंखे यांच्या जीवनप्रवासाचा उलगडा केला. बापूजींचा भारतरत्न, पदमविभूषण देऊन गौरव व्हावा अशी मागणी केली. यावेळी बापूजींच्या टपाल तिकिटाचे आणि शताब्दी लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ आर व्ही शेजवळ, प्राचार्य युवराज भोसले, नामदेव कांबळे यांच्यासह निमंत्रित मान्यवर शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शिक्षण संस्थातील शिक्षक भरती केंद्रीय पध्दतीने करणार - शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *