महत्वाच्या घडामोडी

खासगी आराम बस पलटी; १७ जण जखमी

प्रतिनिधी
Jun 10 / 2018

कोल्हापूर : कोल्हापूर-पन्हाळा रोडवर बोरपाडळे घाटात आंबवडे कमानीजवळ भरधाव खासगी आराम बस पलटी झाली. यावेळी झालेल्या अपघातात बसमधील १७ प्रवासी जखमी झाले. रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी पन्हाळा फिरून कोल्हापूरकडे येत असताना हा अपघात झाला. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामध्ये केतन गोविंद महाजनी (वय ५४ ), रवींद्र गणपतदास शेठ (वय ५५), राधिका मोहन तक (वय ५५), विनोद बळवंत गोडबोले (वय ५२), मुकुंद विनायक मोघे (वय ५४), नलिनी विलास पोवार (वय ५४, रा. सर्व सातारा), प्रशांत मनोहर कुलकर्णी (वय ५४), रिता राजेश चिटणीस (वय ५५), विजय वसंत कुलकर्णी (वय ५५, रा. तिघे पुणे), अनुश्री चैतन्य चिरमुले (वय ५५), शिवानंद मधुकर देशपांडे (५६), विवेक नेवाळकर (५५), डॉ. दिनेश पेंढारकर (वय ४५, रा. चौघे मुंबई), नितीन बुधकर (वय ५६, रा. नाशिक), अंजली देशमुख (वय ५४, बेंगलोर), सुप्रिया फडणीस (वय ५५), उमेश कुलकर्णी (वय ५५, रा. दोघे पुणे) जखमी झाले आहेत. सातारा येतील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या १० वीच्या १९७८ बॅचच्या विद्यार्थ्यांनी सहलीचे आयोजन केले होते. डॉ. गिरीश पेंढारकर हे सर्व मित्रांना एकत्र आणून गेल्या चार ते पाच वर्षांपासून मे-जून महिन्यात सहली आयोजित करत असतात. सर्व विद्यार्थी ५२ ते ५६ वयोगटातील असून डॉक्टर, इंजिनिअर, सरकारी नोकरदार, उद्योजक आहेत. रविवारी सकाळी आठ वाजता ते पन्हाळ्यावर आले. संपूर्ण परिसर पाहून झाल्यानंतर दुपारी जेवण करून कोल्हापुरात अंबाबाईदेवीच्या दर्शनाला येणार होते. दुपारी खासगी आराम बसमधून पन्हाळा येथून कोल्हापूरच्या दिशेने येत असताना बोरपाडळे घाटात आंबवडे कमानीजवळ आल्यानंतर भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस एका वळणावर पलटी होऊन शेतवडीत कलंडली. यावेळी बसमध्ये ४० प्रवाशांपैकी १७ जण चिरडल्यामुळे जखमी झाले. प्रसंगावधान राखून काही प्रवासी बाहेर पडले. त्यांनी रस्त्याने जाणाऱ्या लोकांची मदत घेऊन इतरांना बसमधून बाहेर काढले. दरम्यान, १०८ रुग्णवाहिकेस फोन केल्यानंतर ४ रुणवाहिका दाखल झाल्या. त्यातून जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले

खासगी आराम बस पलटी; १७ जण जखमी
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *