महत्वाच्या घडामोडी

आता यूपीएससी शिवाय तुम्ही बनू शकता प्रशासकीय अधिकारी!

प्रतिनिधी
Jun 11 / 2018

नवी दिल्ली – केंद्र सरकारने आता केंद्रीय प्रशासकीय सेवेत समांतर प्रवेशासाठी मंजूरी दिली आहे. सरकारने संयुक्त सचिव पदाच्या १० जागांसाठी अधिसूचना काढली आहे. विविध विभागांसाठी तज्ञांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी तुमच्याकडे विशेष कौशल्याशिवाय या पदासाठी किमान वय ४० वर्षे असणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त वयाची कोणतीही अट नाही. तुमचे वय १ जुलै २०१८ रोजी ४० वर्षे पूर्ण असावे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असावी. सरकारी किंवा खाजगी विभागातील किंवा विद्यापीठातील किमान १५ वर्षांच्या कामाचा अनुभव असणारे उमेदवारही या जागेसाठी अर्ज करु शकतात. कोणतीही लेखी परीक्षा संयुक्त सचिव पदासाठी होत असलेल्या या भरतीमध्ये नसेल. निवडलेल्या उमेदवारांची फक्त मुलाखत होईल. ही मुलाखत कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती घेईल. ३० जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत संयुक्त सचिव पदासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. अधिसूचनेनुसार, सर्व संयुक्त सचिवांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. कामगिरी चांगली असेल तर हा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंतही वाढवला जाऊ शकतो.या जागेसाठी भरती करुन घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा पगार केंद्र सरकारच्या संयुक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याएवढाच असेल.

आता यूपीएससी शिवाय तुम्ही बनू शकता प्रशासकीय अधिकारी!
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *