महत्वाच्या घडामोडी

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल

John Smith
Jun 11 / 2018

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नियमित तपासणीसाठी वाजपेयी यांना दिल्लीतील एम्स मध्ये दाखल केले आहे.एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली अटल बिहारी वाजपेयी यांची तपासणी केली जाईल, अशी माहिती भाजपने दिली. वाजपेयींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने भाजपने पत्रक काढून त्यासंदर्भात माहिती दिली. 93 वर्षीय वाजपेयी हे सध्या राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त आहेत.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *