महत्वाच्या घडामोडी

चीनच्या महत्त्वाकांक्षी योजनेस एकट्या भारताने केला विरोध.

प्रतिनिधी
Jun 11 / 2018

शनिवार व रविवारी येथे झालेल्या शांघाय सहकार्य परिषदेच्या (एससीओ) शिखर परिषदेत भारत वगळता इतर सातही सदस्य देशांनी चीनच्या बेल्ट अॅण्ड रोड या महत्त्वाकांक्षी योजनेस पाठिंबा दिला वया योजनेच्या यशासाठी कटिबद्धता व्यक्त केली.मात्र या परिषदेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास करून शेजारी देशांशी व एससीओ मधील सदस्य देशांची संपर्काची साधने वाढविण्यावर भर दिला.याच योजनेचा एक भाग असलेल्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर चा महामार्ग पाकव्याप्त काश्मीरमधील वादग्रस्त गिलगिट-बालतीस्तानमधून जात असल्याने राष्ट्रीय सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावर भारताने आपला विरोध कायम ठेवत या परिषदेत या मुद्द्यांवर अन्य देशांची री ओढली नाही. परिषदेनंतर जारी करण्यात आलेल्या १७ पानी चिंगदाओ जाहीरनाम्यात चीनच्या बेल्ट अॅण्ड रोड योजनेस भारत वगळून इतर देशांनी पाठिंबा दिला.भारताची ही भूमिका नवीनाही. पंतप्रधानांनी या आधीही ती स्पष्ट केली आहे. त्यामुळे या परिषदेतही भारताने वेगळी भूमिका घेणे अपेक्षित नव्हते,असे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. परिषदेत बोलताना मोदींनी स्पष्ट केले की, परस्परांशी संपर्क, व्यापार व देवाण-घेवाण वाढेल, अशा सर्वच प्रयत्नांना भारताचा पाठिंबा आहे.मात्र अशा योजना सर्वांनासामावून घेणाºया, पारदर्शी व संबंधित देशाच्या क्षेत्रिय सार्वभौमत्वाचा आदर करणाºया असायला हव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. हल्ली वाहतुकीची साधने व डिजिटल क्रांतीमुळे भूगोल बदलत आहे. त्यामुळे शेजारी देश आणि एससीओ मधील देशांशी संपर्क वाढविण्यास भारताचा अग्रक्रम राहील.गेल्या वर्षी पूर्ण सदस्य म्हणून सामील करून घेतल्यानंतर भारताचे पंतप्रधान यंदा या परिषदेत प्रथमच सहभागी झाले. या परिषदेच्या यशासाठी भारत नेहमीच सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे त्यानी आश्वासन दिले. भारत व पाकिस्तान खेरीज चीन, रशिया, इराण, कझागस्तान, उजबेकिस्तान, किरगिझिस्तान या मूळ सदस्यदेशांचे नेते या परिषदेत सहभागी झाले.

चीनच्या महत्त्वाकांक्षी योजनेस एकट्या भारताने केला विरोध.
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *