कोल्हापूर

राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांची आत्महत्या अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक - खासदार धनंजय महाडिक

प्रतिनिधी
Jun 13 / 2018

राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी केलेली आत्महत्या अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक घटना आहे. गेली २० वर्षे भय्यूजी महाराज यांचा आमच्या कुटुंबियांशी घनिष्ठ संबंध होता. एक सदाबहार ऊर्जा देणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. त्याचबरोबर सामाजिक, अध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचा मोठा दबदबा होता. युवाशक्तीच्या फूड बँक उद्घाटन सोहळ्याला भय्यूजी महाराज आवर्जून आले होते. तसेच भीमा कृषी प्रदर्शनालाही भेट देवून, सेंद्रीय शेतीबद्दल त्यांनी मोलाची माहिती दिली होती. सर्वोदय परिवाराच्या माध्यमातून वृक्षारोपण, शिक्षण या क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली होती. युवकांना प्रेरणा देणारे आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनाही आधार वाटणारे भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या करुन जीवन संपविले यावर विश्‍वास ठेवणेही कठीण बनले आहे. त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली आणि या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना, अनुयायांना परमेश्‍वर बळ देवो, हीच प्रार्थना.

राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांची आत्महत्या अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक - खासदार धनंजय महाडिक
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *