महत्वाच्या घडामोडी

पोलीस ठाण्यात बदलीचे राजकारण; रुजू होण्याचे आदेश अले तरी विनवणी सुरूच

प्रतिनिधी
Jun 13 / 2018

कोल्हापूर : (आश्विनी खोंद्रे )पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदलीचे गॅजेट निघाल्यापासून पोलीस ठाण्यात बदलीचे मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. बलीच्या गॅजेटमुळे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाम मांडलेल्या पोलिसांना दुसऱ्या ठिकाणी जावे लागणार असल्याने इच्छुक स्थळी बदली होण्यासाठी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात वरिष्ठ पातळीवर हालचाली केल्या जात आहेत. दरम्यान बदलीचे आदेश मिळताच बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले आहेत. मात्र अजूनही काही पोलीस कर्मचाऱ्यांची इच्छुक स्थळी बदली करून घेण्यासाठी धडपड सुरू असल्याचे दिसत आहे. मागील महिन्यापासून कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलिस शिपायांसह पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे गॅजेट जाहीर झाले, आणि पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. विविध करणे सांगून वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाम मांडलेल्या पोलिसांच्या तर तोंडचे पाणी पळाले आहे. अचानकपणे जाहीर झालेल्या या गॅजेटमुळे काही पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या इच्छुक स्थळी बदल्या झाल्या, तर काहींच्या पदरी निराशा आली. यामुळे कही खुशी कही गम असे काहीसे वातावरण पोलिसांमध्ये निर्माण झाले. इच्छुक स्थळी बदली होण्यासाठी पोलिसांसाठी विनंती अर्ज हा राजमार्ग असला तरीही यातून आपल्याला हव्या त्या ठिकाणी बदली मिळेल याची शास्वती नाही. यामुळे वरिष्ठ पातळीवर विनवणी करणे सोयीस्कर बनले. यातून काही पोलिसांच्या हव्या त्या ठिकाणी बदल्या झाल्या, मात्र अजूनही काही पोलीस कर्मचार्‍यांच्या पदरी निराशाच आल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मनधरणी करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दरम्यान काही पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतः च्या बदलीसाठी मोठ्या प्रमाणात वशिला लावला असून साहेब आपल्या मर्जीतील पोलिसांनाच आपल्या सोबत नेणार अशी चर्चा काही पोलिसांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. यामुळे सध्या पोलीस ठाण्यात बदलीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू असून वरिष्ठ पोलिसांकडून बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश आले तरीही पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलीस ठाण्यात बदलीचे राजकारण; रुजू होण्याचे आदेश अले तरी विनवणी सुरूच
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *