कोल्हापूर

माजी सैनिक मुलींच्या विवाह पित्यार्थ आर्थिक मदत-मेजर सुभाष सासने (नि.)

प्रतिनिधी
Jun 13 / 2018

कोल्हापूर, दि. 13 : कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिकांनी सन 2017-18 या वर्षात आपल्या मुलींचा विवाह झाल्यानंतर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर यांच्यामार्फत KSB, नवी दिल्ली यांच्या वेबसाईटवरुन ऑनलाईन अर्ज आर्थिक मदतीसाठी सादर करण्यात आले होते. त्यापैकी एकूण 46 अर्जांची आर्थिक मदत मंजूर झाली असून, लवकरच ती माजी सैनिकांच्या बँक खाती प्रत्येकी रु. 50,000/- एवढी आर्थिक मदत जमा होणार आहे. ज्या माजी सैनिकांनी सन 2018-19 या वर्षामध्येही मगील वर्षाप्रमाणे ही योजना लागू असलेल्या माजी सैनिकांनी आपल्या मुलींचा विवाह झाल्यानंतर 180 दिवसाच्या आत सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी 0231-2665812 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेटावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मेजर सुभाष सासने (नि.) यांनी केले आहे.

माजी सैनिक मुलींच्या विवाह पित्यार्थ आर्थिक मदत-मेजर सुभाष सासने (नि.)
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *