कोल्हापूर

भरधाव कारच्या धडकेत मोटरसायकलस्वाराचा मृत्यू

प्रतिनिधी
Jun 13 / 2018

कोल्हापूर : भरधाव कारच्या धडकेत मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला .सतीश मारुती पाटील (वय 41 रा. प्रयाग चिखली) असे मृताचे नाव असून हा अपघात आज सायंकाळी कोल्हापूर पन्हाळा रोडवरील पडवळवाडी जवळ घडला. सतीश मारूती पाटील हे सेंद्रींग काँट्रॅकर होते .आज दुपारी ते कामानिमित्त मोटरसायकलवरून पन्हाळ्याकड चालले होते . ते पडवळवाडी जवळ इथं आले असता पन्हाळ्याहून कोल्हापूरकडे चाललेल्या एका कारची त्यांना जोराची धडक लागली . त्यात पाटील गंभीर जखमी झाले .नागरिकांनी उपचारासाठी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केल . मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पाटील यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली, एक मुलगा, आई असा परिवार आहे .

भरधाव कारच्या धडकेत मोटरसायकलस्वाराचा मृत्यू
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *