कोल्हापूर

सेनेच्या आंदोलनात म्हैस उधळली!

प्रतिनिधी
Jun 14 / 2018

कोल्हापूर : ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना रेशन कार्डवर दोन किलो गहू आणि 1 किलो मक्का देण्याचे परिपत्रक शासनाने जाहीर केले आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान आंदोलनस्थळी आणलेली म्हैस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत घेण्याचा प्रयत्न करत असताना म्हैस अचानक उधळल्याने पोलिसांसह कार्यकर्त्यांची एकच तारांबळ उडाली. मात्र कार्यकर्त्यांनी वेळीच सावधानता बाळगत यांनी म्हैशीला गेटमधून बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी कार्यकर्त्यांनी रेशनवर मक्का देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो आशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयल्याचा परिसर दणाणून सोडला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, दुर्गेश लिंग्रज, शिवाजी जाधव, सुजित चव्हाण यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेनेच्या आंदोलनात म्हैस उधळली!
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *