कोल्हापूर

राजर्षी शाहू महाराज याच्यावर आधारित राजश्री चित्रमय पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार याच्या हस्ते संपन्न

प्रतिनिधी
Jul 28 / 2018

कोल्हापूर प्रतिनिधी:- लोकराज फोरम च्या माध्यमातून आज शाहूंच्या विचाराचा प्रसार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी चित्रमय स्वरूपात शाहूंचा विचार मांडणारे राजर्षी चित्रमय पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.राजा हे पद लोकांची सेवा करण्यासाठी असून त्याला स्मरून शाहू महाराजांनी त्यावेळी केलेली कामे ही अत्यंत दर्जेदार व लोकहितवादी होती सर्व क्षेत्रातील लोकांना एकत्र आणण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन देण्याचे काम राजर्षी शाहू महाराजांनी केले.या पुस्तकात अगदी सोप्या चित्रमय स्वरूपात या घटना माडल्या आहेत आपण सर्वांनी त्याच्याशी जोडले जाव व याचा लोकउपयोगी कामासाठी चांगला उपयोव व्हावा यासाठी लोकराजा फोरम च्य वतीने सर्वांनी एकत्र येऊन या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की,चित्रमय स्वरूपातील कल्पना तरुण मंडळींनी कृतीत आणली यातून शाहूंचा विचार संपूर्ण घराघरात पोहोचनार आहे.शाहू महाराजांचे विचार हे महाराष्ट्रा पर्यंत मर्यादित राहील नसून अगदी हिंदी परिसरात देखील ते मोठ्या प्रमाणावर रुजले आहे.उत्तर प्रदेश तसेच बिहार मध्ये आपणास शाहू महाराज व महात्मा फुले यांचे पुतळे आपणास पहावयास मिळतात.महाराजांनी गादीवर बसण्या आधी आपले शिक्षण पूर्ण केले व अधिक महिती व्हवी म्हणून देशाचा दवरा केला त्यानंतर त्यांना कोणते बदल केले पाहिजेत याची जाणीव झाली.कोणताही निर्णय घेताना आपण रयतेचे सेवक ही भावना शेवट पर्यंत राहिली. आज्ञापत्रक आजही मार्गदर्शक ठरेल.त्यानंतर पवार म्हणाले गोखले इन्स्टिट्यूट ऑफ टेकॉनॉलॉजी याच्या सर्वे नुसार मराठवाडा व विदर्भ या ठिकाणी ४५ % शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या न परवडणारी शेती व निसर्गाचा कोप अश्या घटनांमुळे होतात पण शाहू महाराजांनी १०० वर्षं पूर्वी राधानगरी धारण तसेच शेतीस पूरक व्यवसाय,वीज प्रकल्प अश्या गोष्टी राबवत पर्यायी व्यवस्था निर्माण केली होती.इथल्या माणसांना त्यांनी व्यापार करण्यास सांगितले त्यामुळे इथे आपल्यातील व्यापार करणारे अनेक लोक आज देखील दुसून येतात.त्याच बरोबर शेतकऱ्याच्या मुलाला कसे शिकत येईल यासाठी सकाळी व संदयकली शाळांची सोया शाहू महाराजांनी केली होती.अश्या शाहू महाराजांच्या समाजउपयोगी कामाचा उजाळा त्यांनी आपल्या भाषणात केला. त्यानंतर या पुस्तकचे लेखक उमेश सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणणे की,याआधी विविध मद्यमातून लिहीत आलो पण पुस्तक लिहिण्याची ही पहिलीच वेळ होती.या पुस्तकात १९ प्रकरणाची मांडणी केली असून प्रत्यक्ष प्रकरणांना संदर्भ नोंदवण्यात आला आहे.महाराजांचे कार्य हे समाजाच्या चौकटीत नव्हते चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांनी कार्य केले.त्यांनी शैक्षणिक,सामाजिक,क्रीडा,बहुजनांना राजकीय प्रवाहात आणण्याचे काम आशा सर्वच क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले.या प्रसंगी त्यांनी आई वडील नसल्याची तसेच डॉ.नरेंद्र दाभोलकर व कॉ.गोविंद पानसरे नसल्याची खंत व्यक्त केली. यानंतर या पुस्तकात ९० वेगवेगळी शाहूच्या जीवनावर आदरीत चित्रे आहेत यांचे चित्रीकरण करणारे चित्रकार विजय चोकाक कर यांनी रेखाटली आहेत.यांनीच रेखाटलेले शाहू महाराजांचे राज्याभिषेका वेळचे चित्र देऊन मा.शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आ.हसन मुश्रीफ,खासदार धनंजय महाडिक,निवेदिता माने, आ.प्रकाश आवाडे, कलाप्पा आवडे,आ.हेमंत टाकले,शाहू महाराज, संजय मंडलिक इ मान्यवर उपस्थित होते.

राजर्षी शाहू महाराज याच्यावर आधारित राजश्री चित्रमय पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार याच्या हस्ते संपन्न
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *