Indian overseas Bank recruitment 2025

 

Indian overseas Bank recruitment 2025
Indian overseas Bank recruitment 2025 

इंडियन ओव्हरसीज बँकेत नोकरीची संधी

इंडियन ओव्हरसीज बँकेत नोकरीची सुवर्णसंधी – विविध राज्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू

इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) मध्ये लोकल बँक ऑफीसर (स्केल - I) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रात स्थिर व प्रतिष्ठित नोकरीची संधी शोधत असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.

रिक्त पदांचा तपशील

  • तामिळनाडू (तमिळ): २६० पदे
  • ओरिसा (ओरिया): १० पदे
  • महाराष्ट्र (मराठी): ४५ पदे (अजा – ७, अज – ३, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – ५, खुला – १८) – दिव्यांग: OC व ID प्रत्येकी १ पद
  • गुजरात (गुजराती): ३० पदे
  • पश्चिम बंगाल (बंगाली): ३४ पदे
  • पंजाब (पंजाबी): २१ पदे

पात्रता आणि वयोमर्यादा

  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (दि. १ मे २०२५ पर्यंत)
  • वयोमर्यादा: २० ते ३० वर्षे
  • वयोमर्यादेत सवलत: इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे

वेतनश्रेणी आणि सेवाशर्ती

  • पद: असिस्टंट मॅनेजर (स्केल - I)
  • वेतन: ₹48,480 – ₹85,920 + DA, HRA, CCA
  • प्रोबेशन कालावधी: २ वर्षे

निवड प्रक्रिया

निवड ऑनलाइन परीक्षा, स्थानिक भाषा प्राविण्य चाचणी (LPT) आणि पर्सनल इंटरव्ह्यू वर आधारित असेल.

ऑनलाइन परीक्षा तपशील:

  • कालावधी: ३ तास
  • एकूण गुण: २००
  • एकूण प्रश्न: १४० (MCQ)

सेक्शन:

  • रिझनिंग व कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड – ३० प्रश्न, ६० गुण
  • जनरल/इकॉनॉमिक/बँकिंग अवेअरनेस – ४० प्रश्न, ४० गुण
  • डेटा ॲनालिसिस व इंटरप्रिटेशन – ३० प्रश्न, ६० गुण
  • इंग्लिश लँग्वेज – ४० प्रश्न, ४० गुण

प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.

LPT (Language Proficiency Test):

१०वी/१२वीमध्ये स्थानिक भाषा शिकलेल्या उमेदवारांना ही चाचणी माफ केली जाईल.

इंटरव्ह्यू:

ऑनलाइन परीक्षेत पात्र उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल. अंतिम निवड गुणांनुसार करण्यात येईल.

अर्ज शुल्क

  • अजा/अज/दिव्यांग: ₹१७५ (इंटिमेशन चार्जेस)
  • इतर सर्व प्रवर्ग: ₹८५०

परीक्षा केंद्रे (महाराष्ट्रात)

छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/MMR, अमरावती, लातूर, नांदेड, जळगाव, धुळे, अकोला, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर

महत्त्वाची तारीख

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ मे २०२५
  • अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ: www.iob.in
टीप: मराठी उमेदवारांसाठी ही भरती विशेष संधी ठरू शकते. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या