DA वाढ जुलै 2025: केंद्र कर्मचाऱ्यांना दिलासा, महागाई भत्ता 59% पर्यंत जाणार?
mahanewslive | 23 जुलै 2025
केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन माहितीच्या आधारे, जुलै 2025 पासून DA मध्ये 4% वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या 55% असलेला महागाई भत्ता 59% पर्यंत पोहोचू शकतो.
DA म्हणजे काय?
महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या महागाईमुळे वाढलेल्या खर्चाची भरपाई करण्यासाठी दिला जातो. हा दर जानेवारी आणि जुलै या दोन महिन्यांपासून लागू होतो आणि CPI-IW (ग्राहक किंमत निर्देशांक) यावर आधारित असतो.
सूत्र: DA (%) = [(CPI-IW सरासरी – 261.42) ÷ 261.42] × 100
CPI आकड्यांची सध्यस्थिती
मे 2025 पर्यंतचे आकडे जाहीर झाले असून CPI-AL व CPI-RL मध्ये घसरण दिसून आली आहे. हे आकडे DA वर थेट परिणाम करत नसले तरी महागाईची दिशा दाखवतात.
पगारावर याचा परिणाम
जर मूळ पगार ₹18,000 असेल, तर सध्या DA ₹9,900 आहे. DA 59% झाल्यास ₹10,620 होईल, म्हणजेच ₹720 ची वाढ.
अंतिम निर्णय केव्हा?
जून 2025 चा CPI डेटा जुलै अखेरीस येईल. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सरकार अधिकृत निर्णय घेईल आणि जुलैपासून लागू करून एरिअर्ससह रक्कम देणार आहे.
8वा वेतन आयोग?
सध्या कर्मचारी 7व्या वेतन आयोगाअंतर्गत येतात. 8वा आयोग लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
0 टिप्पण्या