![]() |
NPCI चा नवा निर्णय – UPI युजर्ससाठी नवे नियम |
UPI युजर्ससाठी मोठी बातमी: 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार नवीन नियम
लेखक: mahanewslive.com | अपडेट: 27 मे 2025
NPCI चा नवा निर्णय – UPI युजर्ससाठी नवे नियम
जर तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm किंवा इतर कोणतेही UPI अॅप वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युजर्सच्या सुरक्षिततेसाठी आणि सिस्टीमच्या स्थिरतेसाठी 1 ऑगस्ट 2025 पासून UPI API सेवा मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 ऑगस्टपासून UPI मध्ये काय बदल होणार आहेत?
1. बॅलन्स चेकवर मर्यादा
- युजर्स दिवसातून फक्त ५० वेळा बॅलन्स चेक करू शकतील.
- दोन अॅप्स वापरल्यास प्रत्येकी ५० वेळा.
2. ऑटोपे व्यवहारांवर वेळेचं बंधन
- सकाळी 10 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9.30 या वेळेतच ऑटोपे व्यवहार करता येतील.
3. ट्रांझक्शन स्टेटस तपासणीवर नियंत्रण
- पेमेंट फेल झाल्यास वारंवार ट्रांझक्शन स्टेटस चेक करण्याची सुविधा मर्यादित.
4. लिंक्ड बँक अकाऊंट तपासणी मर्यादा
- एका दिवसात फक्त २५ वेळा मोबाईल नंबरशी लिंक असलेली बँक अकाऊंट लिस्ट पाहता येईल.
NPCI चा उद्देश काय आहे?
- डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करणे
- API चा दुरुपयोग टाळणे
- सिस्टमवरचा लोड कमी करणे
युजर्ससाठी सल्ला
- व्यवहार करताना वेळेचं आणि मर्यादेचं भान ठेवावं.
- बॅलन्स आणि स्टेटस तपासताना गरजेपुरतंच API वापर करावा.
निष्कर्ष
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. UPI युजर्सनी ही माहिती शेअर करावी आणि आपला अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहावा.
0 टिप्पण्या