Social Media:१५ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मिडिया बॅन? राष्ट्रपतींचा निर्णय

Social Media:१५ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मिडिया बॅन? राष्ट्रपतींचा निर्णय

Social Media:१५ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मिडिया बॅन? राष्ट्रपतींचा मोठा निर्णय

फ्रान्समध्ये १५ वर्षांखालील मुलांना सोशल मिडिया वापरण्यावर बंदी घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही माहिती राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रों यांनी एका गंभीर घटनेनंतर दिली. फ्रान्सच्या नोझों (Nogent) शहरातील एका मिडल स्कूलमध्ये १४ वर्षीय विद्यार्थ्याने एका ३१ वर्षीय स्टाफ सदस्यावर चाकू हल्ला करून त्याचा खून केला, तसेच एका पोलिस अधिकाऱ्यालाही जखमी केले.

मॅक्रों यांचा इशारा: “युरोपने जर काही पावले उचलली नाहीत, तर फ्रान्स स्वतंत्रपणे कठोर कायदा करेल. आम्ही आता वाट पाहू शकत नाही.”

सोशल मिडियावर बंधनाची गरज का?

राष्ट्रपती मॅक्रों यांच्या म्हणण्यानुसार, डिजिटल प्लॅटफॉर्म्समुळे लहान वयातच मुलांमध्ये हिंसक वर्तन वाढत आहे. मुलांपर्यंत सहजपणे पोहचणारी ही माध्यमं त्यांच्यावर नकारात्मक प्रभाव टाकत आहेत. त्यांनी सांगितले की, सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सकडे वय पडताळणीसाठी तंत्रज्ञान आहे, त्यामुळे त्याचा वापर केला पाहिजे.

नोझों हत्याकांडानंतरच निर्णयाची चर्चा

नोझों शहरात घडलेल्या हिंसक घटनेमुळे फ्रान्समध्ये मोठा खळबळ माजली आहे. याचा थेट संबंध सोशल मिडियाशी नाही, असे स्पष्ट झाले नसले तरी, फ्रेंच अधिकाऱ्यांचे मत आहे की आक्रमक वागणूक प्रसारित होण्यासाठी सोशल मिडिया महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

ऑस्ट्रेलियाचा अनुभव

फ्रान्सप्रमाणेच ऑस्ट्रेलियाने देखील सोशल मिडियावर कडक धोरण अवलंबले आहे. २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मिडिया बॅन केला. Snapchat, TikTok, Facebook, Instagram आणि X (पूर्वीचे Twitter) यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर ही बंदी लागू आहे. वय पडताळणीसाठी विशेष तंत्रज्ञान वापरले जात आहे.

कंपन्यांसाठी मोठा दंड: नियमांचे उल्लंघन झाल्यास कंपन्यांवर ५० मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे ₹२७० कोटी) पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

यातून भारताने शिकवे?

भारतात देखील लहान वयातील मुलांमध्ये सोशल मिडियाचे व्यसन आणि त्याचे परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाकडे पाहून भारतातही यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

सोशल मिडियाचा सकारात्मक उपयोग शक्य असला तरी योग्य वयात आणि योग्य मार्गदर्शनाखालीच त्याचा वापर होणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या